नेरळजवळ धावत्या लोकलवर दगडफेक

रायगड माझा वृत्त । कर्जत

Image may contain: 1 person, standingनेरळ-शेलू रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलवर दगडफेक केल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. रोहिदास शिनारे असे या जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या हाताची नस फाटून तो फ्रॅक्चरही झाला आहे. रक्तबंबाळ झालेल्या या तरुणाला सहप्रवाशांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करत नेरळ येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी रोहिदासला तत्काळ बदलापूर येथे हलविले. याप्रकरणी पोलिसांनी माथेफिरूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

होळीचा सण असल्याने लगबगीने घरी जाण्यासाठी रोहिदास याने सायंकाळी ६.५७ मिनिटांची शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कर्जत जलद लोकल पकडली. ही गाडी शेलू स्थानकात पोहचल्यानंतर पुढच्याच नेरळ स्टेशनवर उतरायचे असल्याने रोहिदास दरवाजात येऊन उभा राहिला. मात्र स्थानक सोडल्यानंतर नेरळजवळ माथेफिरूने या लोकलवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात रोहिदासच्या हाताला जबरदस्त दुखापत झाली. त्याची नस फाटली आणि हातही फ्रॅक्चर झाला. अचानक घडलेल्या या घटनेने सगळे प्रवासी हादरून गेले. त्यांनी तत्काळ नेरळ स्थानक येताच रक्तबंबाळ झालेल्या रोहिदासला येथील एका रुग्णालयात दाखल केले.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत