नेरळमध्ये आणखी एका व्यक्तीची आत्महत्या

नेरळ : अजय गायकवाड (प्रतिनिधी)

छायाचित्र : मृत व्यक्ती

कर्जत तालुक्यातील नेरळ-फणसवाडी येथे राहणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. राघो दरोडा असे या व्यक्तीचे नाव आहे. गावा शेजारी असणाऱ्या विहीरीत उडी मारून त्याने आपलं जीवन संपवलंय. या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, राघो दरोडा हे घरातून मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाजता बाहेर पडले होते. उशिरा पर्यंत घरात परतुन न आल्याने, शोध घेण्यासाठी बाहेर निघालेल्या पत्नीला विहिरीच्या बाजूला नवऱ्याची चप्पल दिसून आल्याने ही घटना उघडकीस आली. गावकऱ्यांच्या मदतीने दरोडा यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

दरोडा हे नेरळ मधील प्रसिद्ध किराणा व्यापारी यांच्या दुकानात कामाला होते. पत्नीच्या माहेरच्या जागेचा वाद सुरु असल्याने दरोडा हे त्या कामात धावपळ करीत होते. गेले दोन दिवस ते कामावर सुद्धा हजर झाले नव्हते. दरोडा यांचा मृतदेह ज्या विहिरीत सापडून आला त्या ठिकाणी त्यांच्या खिशातून काही पाचशेच्या नोटा ह्या पाण्यावर तर काही पैसे हे त्यांच्या खिश्यात आढळून आले.

एकूणच या प्रकरणाबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. दरोडा यांची हत्या की आत्महत्या हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला असून, या बाबत नेरळ पोलीस हे कसा शोध घेतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान नेरळ परिसरात तरुणांची आत्महत्या करण्याची संख्या ही वाढत असल्याचे समोर येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत