नेरळमध्ये  इमारतीचा पाया खचल्याने सुरक्षा भिंत कोसळली

नेरळ : कांता हाबळे 

नेरळ शहरात मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकामे सुरू असून अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. अशाच एका इमारतीची संरक्षक भिंत दुसऱ्या इमारतीवर कोसळली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, बिल्डरांनी केलेले निकृष्ठ दर्जाचे काम हे येथील रहिवाश्यांसाठी मृत्यूचं सापळा ठरणार आहेत.

नेरळमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठं मोठ्या बिल्डर लॉबीचे इमारतीचे प्रोजेक्ट सुरू आहेत. अनेक बिल्डर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवं नवीन युक्त्या लढवत आहेत, टेकड्यांवर देखील इमारतीचे बांधकामे सुरू केले असून भविष्यात या टेकडीवरील इमारतींच्या सुरक्षतेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात नेरळला सततच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. या सततच्या पावसाने नेरळ हुतात्मा हिराजी पाटील नगर येथील इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडलीये. नव्याने सुरु असलेल्या उंच टेकडीवर असलेल्या बलीदर सिंग यांच्या त्रिशूल अपार्टमेंट मध्ये हि घटना घडली.

या इमारतीच्या पाया खालची जमीन पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने इमारतीला असलेली सुरक्षा भिंत दोन दिवसापूर्वी रात्री कोसळली. यात मोठया प्रमाणात विटांचे बांधकाम आणि मातीचा भराव दुसऱ्या बिल्डिंगवर कोसळला. या घटनेत कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी भविष्यात आशा निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे येथील भविष्यात रहिवाशानची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. नेरळ हुतात्मा हिराजी पाटील नगर येथे 10 ते 15 इमारती उंच टेकडीवर एका खाली एक असे पायरी स्वरूपात उभारण्यात आल्या आहेत. तर काही इमारतीची कामे चालू आहेत, या इमारती बांधकामं करण्याऱ्या बिल्डरने त्या रहिवासीसाठी कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरविल्या नाहीत. अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, या पाण्या मुळे दुसऱ्या इमारतींच्या सुरक्षा भिंती सुद्धा खचल्या आहेत. त्यामुळे येथील इमारतीची सुरक्षा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.

या इमारतीच्या पडलेल्या सुरक्षा भिंतीचे नेरळ ग्रामपंचायतीने पंचनामा केला असून आशा निकृष्ठ दर्जाचे बांधकाम बंद करून या बिल्डवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायतीने नेरळ पोलीस ठाण्यात केली आहे. नेरळमध्ये अशा इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत. बिल्डर आपल्या मर्जीने बांधकाम करत असून यावर स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ग्रामपंचायत आणि बिल्डर यांच्यात गुंतलेले नेरळ यामधून बाहेर पडण्याची आशा नेरळकर नागरिक करीत आहेत.

नेरळ हुतात्मा नगर मध्ये सुरू असलेल्या इमारतीची सवरक्षक भिंत कोसलली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी येथे मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. भविष्यात येथे इमारत कोसळून मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने आम्ही बांधकाम पूर्ण बंद करून बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र पोलीस स्टेशन देण्यात येणार आहे. 
– राजेश मिरकुटे: ग्रामपंचायत सदस्य, नेरळ
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत