नेरळमध्ये डॉक्टरांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले

नेरळमधील डॉक्टर हेमंत शेवाळे यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी

ऍडमिट करून न घेतल्याच्या कारणावरू दोन जणांनी केली मारहाण; नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नेरळ – कांता हाबळे
नेरळ शहरात डॉक्टरांना मारहाण आणि दमदाटी करण्याच्या घटना वाढतच आहेत. दोन महिन्यांपूर्वी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरांना दमदाटी करण्यात आल्याने ते राजीनामा देऊन निघून गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा नेरळ खांडा येथील खासगी रुग्णालयातील डॉ. हेमंत शेवाळे यांना मारहाण करून शिवीगाळ , आणि जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. या संदर्भात नेरळ खांडा येथील दोन जणांविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत नेरळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसारनेरळ पोलीस ठाणे हद्दीत 31 ऑगस्ट रोजी नेरळ खांडा येथील दोन जणांनी नेरळ खांडा येथील दवाखान्यात जाऊन मला दुखापत झाल्याचे खोटे सांगून मला ऍडमिट करून घ्या. असे बोलले तेव्ह तेथील डॉक्टर हेमंत शेवाळे यांनी अंतर्गत व बाह्य प्रथम दर्शनी दुखापत दिसत नसल्याने त्यांना सोनोग्राफी व एक्स-रे करून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या असे सांगितले. व ऍडमिट करून घेतले नाही याचा मनात राग धरून दोन त्या दोन जणांनी डॉक्टर शेवाळे यांना मारहाण करून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली व फिर्यादी त्यांच्या पत्नी यांना देखील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रोफ करीम बाजी आणि प्रदीप चंद्रकांत भगवत अशी या दोन जणांची नावे आहेत.

      याबाबत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र राज्यातील वैद्यकिय सेवा व्यक्ती बाबत घडणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि वैद्यकीय सेवा संस्थांच्या मालमत्ते च्या हानी किंवा नुकसान होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच तत्सबंधित व तदानूशगिक बाबीं साठी तरतूद अधिनियम 2010 चे कलम 44 प्रमाणे नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाघमारे अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत