नेरळमध्ये दहीहंडी उत्सवात थरावर थर; दहीहंडी उत्साहात

अभिजित कोसंबी, सावनी रविंद्र, प्राप्ती दहिवलीकर, ‘सरस्वती’ फेम प्रतिक्षा तावडे ठरले प्रमुख आकर्षण

नेरळ : कांता हाबळे

कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी गोपाळ काल्या निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. दरवर्षी प्रमाणे यंदादेखील नेरळमधील शिवाजी मैदानातील कार्यक्रमात सिनेकलाकारांची उपस्थिति दहीहंडी उत्सावातील प्रमुख आकर्षण ठरली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

कर्जत तालुक्यातील नेरळ परिवर्तन विकास आघाडी आणि टोकरे फाऊंडेशन यांच्यावतीने नेरळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात रात्री उशीरा गोविंदा पथकाने फोडली. या कार्यक्रमात कलर्स मराठी वरील सरस्वती फेम तितीक्षा तावडे आणि संगीत मराठी फेम अभिजित कोसंबी, सावनी रविंद्र, प्राप्ती दहिवलीकर, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

नेरळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नेरळ परिवर्तन विकास आघाडी आणि टोकरे फाऊंडेशन यांच्यावतीने दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे करण्यात आले होते. यामध्ये प्रथम पुरुष गोविंदा पथक पारीतोषक 1, 31, 031व महिला गोविंदा पथकास 51,000 हजार रुपये पारितोषिक सम्राट गोविंद पथक, आई एकविरा गोविंदा पथक बदलापूर यांना विभागून देण्यात आले. यावेळी शेकडो नेरळकरांनी गर्दी केली होती. दहीहंडी स्पर्धेत नेरळ परिसरातील अनेक स्थानिक गोविंदा पथकांसह बदलापूर,वांगणी, कर्जत, येथील गोविंदा पथकानी सहभाग घेतला. यावेळी अनेक गोविंदा पथकाने सलामी दिली.

यावेळी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, संजय मोरे, माजी उप जिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, शिवराम बदे, भाई गायकर, पंचायत समिती सदस्या सुजाता मनवे, सावळाराम जाधव, अंकुश बाभणे, अरुण कराळे, नेरळच्या सरपंच सुवर्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, नितेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत