नेरळमध्ये प्लॅट खरेदी फवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

आंबिवली येथील भास्कर व्हॅली प्रोजेक्टमध्ये 10 लाखांची फसवणूक ; नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा

नेरळ – कांता हाबळे 
नेरळ शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट उभे राहत असून अनेक बिल्डर ग्राहकांची फसवुक करत असल्याचे उघडकीस येत आहे. आठवडा भरपूर्वी नेरळ शहरात 72 लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा नेरळ परिसरातील आंबिवली येथे 10 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की,
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 1 जानेवारी 2007 ते  25 ऑगस्ट 2018 रोजी च्या  दरम्यान चार जणांनी संगणमत करून जाहीराती प्रमाणे मौजे आंबिवली गावात भास्कर व्हॅली प्रोजेक्टमघ्ये फिर्यादी रा. नवी मुबई यांचे दोन प्लॉट व फिर्यादी यांचा मित्र यांचे दोन प्लॉट तसेच त्यांची पत्नी यांचे नावे दोन प्लॉट असे सर्वाचे मिळुन एकुण 10,47,600 /- रूपये खरेदी करण्याचे संपुर्ण पैसे 2007 सालापर्यत स्विकारून सन 2010 पर्यत प्लॉट ताब्यात देतो असे आश्वासन देवुन आज रोजी पर्यत फिर्यादी व त्यांचे मित्र यांना प्लॉटचे रजिस्टे्रशन करून प्लॉट नावावर न करता तसेच त्यांचे घेतलेले पैसे परत न करता फिर्यादी व त्यांचे मित्र यांची आन्यायाने विश्वासघात करून फसवणुक केलेली आहे.
      याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं.कलम 420,406,34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक एस.एस.डवले हे करीत आहेत. त्यामुळे नेरळ शहरात दिवसेंदिवस प्लॅट खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. तसेच पुढेही अशा प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची चर्चा नेरळ व परिसरात असल्याने प्लॅट खरेदी करणार्यानी या बाबतजरा सावधान राहून योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत