नेरळमध्ये विजेचे खांब नूतनीकरण, वीजबिल भरणा केंद्र व अन्य समस्या सोडविण्याची मागणी

महावितरणाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची नेरळकरानी केली मागणी

नेरळ – कांता हाबळे
नेरळ शहरातील आणि नेरळ ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी पुरेशा प्रमाणात वीज मीटर, एल. टी, पोलचे नुतनीकरण व नेरळ शहरात स्वतंत्र विजेचे बिल भरण्याकरिता केंद्र उभारावे अशा अनेक मागण्यासाठी नेरळ करानी महावितरणच्या पनवेल येथील कार्यकारी अभियंता सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे.
     नेरळ शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी वसाहती, बिल्डिंग उभारल्या जात आहेत. त्यामुळे विजेचे मीटर अपुरे पडत आहेत. तसेच काही मीटर हे नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे वीज कार्यालयात पुरेसे वीज मीटर शिल्लक नसतात, त्यामुळे ग्राहकांना अनेक दिवस मीटरची वाट पाहावी लागते. तसेच नेरळ  शहरात अनेक वर्षांपासून जुने व जीर्ण झालेले पोल बदलण्यात आले नाहीत.त्यामुळे हे पोल कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच पोळवरील कंडक्टर ही अनेक वर्षांपासून बदलण्यात आले नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे. तेही बदलण्यात यावेत.
तसेच नेरळ शहरात मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक असल्याने वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. नेरळ मधील रायगड बँक तसेच कर्नाळा बँक येथे बीज बीले भरली जातात. परंतु कर्नाळा बँक च्या बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रांगा लागतात, बाजूलाच रेल्वे गेट असल्याचे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथे अपघात होण्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे नेरळ शहरात स्वतंत्र वीज बिल भरणा केंद्र उभारण्यात यावे आशा अनेक मागण्यासाठी नेरळ शहरातील नागरिकांनी महावितरण च्या कार्यकारी अभियंता पनवेल यांना निवेदन   देऊन लवकरात लवकर समस्या सोडविण्याची मागणी केली आहे
    यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख अंकुश दाभणे, विभाग प्रमुख, सुधाकर देसाई आबासाहेब पवार, संजय मनवे, जयवंत सालुंखे आदी यावेळी यावेळी उपस्थित होते.
Attachments area
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत