नेरळमध्ये 1 लाख किमतीच्या सोनाच्या दागिन्यांची चोरी; बंद घराचे दार फोडून दागिने लंपास

नेरळ : अजय गायकवाड

कर्जत तालुक्यातील नेरळ बोर्ले येथे बंद घराचे कुलूप फोडून घरातील कपाटातील 1 लाख 20 हजार किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरी करून चोर फरार झाला आहे. तर या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात घरमालकाने तक्रार दाखल केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरळ पूर्व परिसरात येत असलेल्या बोर्ले गावातील कृष्णकुंज बंगल्यात राहणारे वसवं कविता रवींद्र जेतपाल हे पती पत्नी वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे गेले होते. यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घराचे दार उघडे असल्याची व कुलूप दिसत नसल्याची माहिती दिली असता जेतपाल यांनी घरी येऊन पाहणी केली असता घराबाहेरील गेटाचे व घराचा मुख्य लाकडी दरवाज्याचे कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला, तर घरातील तळमजल्यावरील बेडरुमध्ये असलेला लोखंडी कपाटाचे दरवाजे कशानेतरी उचकटलेले दिसले व कपाटातील साहित्य आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तर कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले एक लाख वीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने हे अज्ञात चोरट्यानी लंपास केले होते.या घटने बाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस गिरी हे करीत आहेत. तर कविता रवींद्र जेतपाल यांनी बोलताना सांगितले की जिते ग्रामपंचायतीला आम्ही परिसरात लाईट बसवण्यासाठी वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा लाईट बसवण्यात न आल्याने ही चोरी झाल्याचे म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत