नेरळ आणि कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्म्यांची नावे देण्यासाठी सह्यांची मोहीम!

एक दीप शहीदांचा ग्रुप आणि भगत मास्तर प्रतिष्ठानाचा उपक्रम

कर्जत : कांता हाबळे 

भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुध्द लढताना 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगड येथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. या वीरांच्या नावातून कर्जतचा ज्वाजल्य इतिहास जगाला कळावा आणि त्यांचे कायम स्मरण राहावे, यासाठी कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल आणि  नेरळ रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील स्थानक नाव मिळावे. यासाठी कर्जत तालुक्यात गावागावात सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच वाहनांमधून अलाऊसमेंट करून अहवान करण्यात येत आहे.
सिध्दगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना दोन जानेवारी 1943 रोजी सिध्दगडावर येथे वीरगती प्राप्त झाली ते हुतात्मे झाले. तेथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. तिथे दिवाळीत एक दीप शहीदांचा या ग्रुपच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात येतो.

क्रांतिविरांचे स्मरण

हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील तसेच क्रांतिविरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, हा उद्देश समोर ठेऊन दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहीदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे, मानिवली, पोशीर व इतर गावांमधील तरुण साजरा करत असतात.

रेल्वे स्थानकांना हुतात्म्यांची नावे देण्याची मागणी 

मागील वर्षी या तरुणांनी कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल व नेरळ रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील स्थानक नाव मिळावे. हि संकल्पना मांडली त्यानुसार एक दीप शहीदांसाचा या ग्रुपने व क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानाने मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे व भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना काही महिन्यांपूर्वी निवेदन देण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही खासदारांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरु केला आहे.
देशाला समर्पित झालेल्या या दोन्ही शहीदांना आणि त्यांच्या प्रेरणादायी समर्पणाला कायम स्मरणात ठेवण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकाचे शाहिद भाई कोतवाल कर्जत रेल्वे स्थानक व नेरळ रेल्वे स्थानकाचे शाहिद हिराजी पाटील नेरळ रेल्वे स्थानक असे नामकरण व्हावे अशी सर्व कर्जत तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे. यासाठी अवसरे येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीत मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग होता. त्यासाठी तरुणांनी गावागावात सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
सह्यांची मोहीम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री आणि मा. गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन एक दीप शहीदांसाचा या ग्रुप आणि क्रांतिवीर भगत मास्तर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत