नेरळ ग्रामपंचायतीची अनधिकृत टपरी धारकांवर कारवाई ( व्हिडीओ)

टपरी धारक रस्त्यावर उतरले; व्यापारी संकुलात जागा देण्याचे आश्वासन

नेरळ : कांता हाबळे

नेरळ शहरात मोठ्या प्रमाणात टपरी धारक असल्याने नेरळ बाजारपेठत वाहतूक कोंडी होत होती, अनेक टपरी धारकांनी फुटपाथवर अतिक्रमण केले होते. या विरोधात नेरळ संघर्ष समितीने नेरळ ग्रामपंचायती कडे तसेच नेरळ च्या ग्रामसभेत हे अतिक्रम हटविण्यात यावे अशी मागणी केली होती. व त्यांनी उपोषण करण्याचा इशारा देखील दिला होता आज शुक्रवार दि. 7 सप्टेंबर रोजी कर्जत तहसीलदार कर्जत कार्यालयात यावर चर्चा झाल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीने या टपरी धारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

संघर्ष समितीने दिलेल्या पत्रावर नेरळ ग्रामपंचायतीने गेल्या वर्ष भरात कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही फक्त आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे याआधी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता, त्यावेळी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे मध्यस्थी करून उपोषण स्थगित केले होते. परंतु अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संघर्ष समितीने शुक्रवारी कर्जत तहसीदार यांच्याकडे बैठक आयोजित केली होती. यामद्ये या विषयावर चर्चा करण्यात आल्याने लगेचच सायंकाळी 4 च्या सुमारास नेरळ ग्रामपंचायत प्रशासन आणि कर्मचारी यांनी या अनधिकृत टपरी धारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला टपरी धारक महिलांनी नेरळ ग्रामपंचायतीची वाहने अडवून धरली त्यानंतर नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा करण्यात आली, त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने या टपरी धारकांना नेरळ शहरात सुरू असलेल्या व्यापारी संकुलात दुकाने लावण्यास सांगितले आहे. व शनिवारी सर्व टपरी धारकांना नंबर टाकून तूर्तास दुकान लावण्यासाठी जागा देण्यात येणार आहे. संकुलाचे काम अर्धवट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संघर्ष समितीचे सदस्य बाहेर असल्याने त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नसला तरी नेरळ ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जवळ जवळ सर्वच टपरी धारकांनी आपला समान , किंवा भाजी अन्य समान जमा करून घेतला व त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नेरळ पोलिसांच्या मदतीने सर्व टपऱ्या काढून नेरळ बाजारपेठ मोकळी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ च्या सरपंच सुवर्णा नाईक, ग्रामसेवक, सदस्य मंगेश म्हसकर, नितेश शहा, प्रथमेश,  सदाशिव शिंगवा, राजेश मिरकुटे अनेक ग्रामपंचायत कर्मचारी , तसेच अनेक टपरी धारक व ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शेयर करा

One thought on “नेरळ ग्रामपंचायतीची अनधिकृत टपरी धारकांवर कारवाई ( व्हिडीओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत