नेरळ निर्माण नगरी परिसरात घाणीचे साम्राज्य

नेरळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्घधी, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

नेरळ : कांता हाबळे 

नेरळ शहरातील नेरळ निर्माणनगरी सोसायटीतील नेरळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे मोठया प्रमाणात येथे दुर्घधी पसरली असून येथील नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना नाक मिठीत धरून जावे लागत आहे. याकडे नेरळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

नेरळ निर्माण नगरी परिसरात घाणीचे साम्राज्य

 

नेरळ शहरातील निर्माणनगरी येथे मोठ्या प्रमाणात रहिवासी वास्तव्यास आहेत. येथील नेरळ रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साठून ठेवलेली माती रस्त्यावर आल्याने रस्त्यावर चिखल, आणि कचरा, प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर आल्या आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुर्घधी पसरली आहे. तसेच काही भागात कचरा कुंड्या ओसंडून वाहत असल्याने कचरा रस्त्यावर आला आहे. या भागात घंटागाडी येत नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. याकडे ग्रामपंचायत लक्ष देणार का असा प्रश्न रहिवाशी यांना पडला आहे.
येथून जाणाऱ्या नाकरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना नाक मुठीत घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून निर्माण नागरी परिसर स्वच्छ करावा अशी मागणी निर्माणनगरीच्या नागरिकांनी केली आहे.
निर्माणनगरी भागाची पाहणी केली आहे. घंटागाडीची कमतरता असल्याने अडचण निर्माण होत आहे. परन्तु दोन दिवसात निर्माणनगरी परिसर स्वच्छ  केला जाईल. -राजेश मिरकुटे – सदस्य-नेरळ ग्रामपंचायत
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत