नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांविना रुग्णांचे हाल

एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय, कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी

नेरळ : कांता हाबळे

नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्यांपासून कायमस्वरूपी डॉक्टर च नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. आरोग्य केंद्रात डॉक्टर च नसल्याने काही वेळ ताटकळत बसून गोर-गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच येथील एका डॉक्टरांना नेरळ शहरातील एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने दमदाटी केली असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

रायगड जिल्ह्यात बहुतांश आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कर्जत तालुकयातील नेरळ शहरामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केद्र आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी भागातून रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी खर्चात उपचार मिळावे या आशेने येतात. परंतु नेरळ च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यावर रुग्णांची निराशा होत आहे. या आरोग्य केंद्राला समास्यानी ग्रासल्याने हे आरोग्य केंद्राच आजारी असल्याची ओरड सध्या नागरिकांमधून होताना दिसत आहे.

नेरळ परिसरातील गोर -गरीब गरजू रुग्णांना वेळीत उपचार मिळावेत यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. परंतु नेरळ प्राथमिक आरोग्य नेहमीच रुग्णांना सोयी -सुविधा देण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी वैद्यकीय अधिकारी पद रिक्त तर कधी कर्मचा-यांची पदे अपूर्ण अशा एक ना अनेक समस्यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रासले आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे . दीड महिन्यांपूर्वी येथील डॉक्टर संकेत पवार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. खालिद अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या डॉक्टरांना नेरळ शहरातील एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने दमदाटी केल्याने येही सोडून गेले आहेत. त्यामुळे आता या रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांना येऊन खासगीरुग्णालयांची वाट धरावी लागत आहे.

तसेच मागील वर्षी रायगड जिल्हा परिषदे कडून या आरोग्य केंद्राच्या नुतनीकरणासाठी २३ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. लाखो रुपये खर्चून सुधा आरोग्य केद्र आजही आजारीच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एवढया मोठा निधी कुठे खर्च करण्याचे आला असा प्रश्न येथे येणाऱ्या सर्वानाच पडत आहे. त्याचबरोबर अपुर्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णाची गैरसोय, सफाई कामगारांअभावी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. परंतु याकडे ना लक्ष स्थानिक लोकप्रतिनिधींचे ना प्रशासनाचे. हेच वास्तव आहे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे.

डॉ. संकेत पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. खालिद अन्सारी यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु नेरळ मधील एका राजकीय पुढाऱ्याने या डॉक्टरांना दमदाटी केल्याने तेही सोडून गेले आहेत. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल.
– सी.के.मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी, कर्जत

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात महिनाभरापूर्वी एका एमबीबीएस डॉक्टर ची नेमणूक करण्यात आली होती. परंतु नेरळ मधील काही समाजकठकांनी त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, त्यामुळे ते डॉक्टर राजीनामा देऊन निघून गेले. त्यामुळे येथे दुसरे कोणते डॉक्टर येण्यास तयार होत नाहीत. परंतु या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलणं झालं आहे. दोन दिवसात नवीन डॉक्टर हजर होणार आहेत.

– अनुसया पादिर, जिल्हा परिषद सदस्या, नेरळ

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत