नेरळ बस स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण

स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, रुग्ण, प्रवासी, प्रवाशांना मोठा त्रास

नेरळ : कांता हाबळे

नेरळ शहरातील नेरळ बस स्थानक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दोन वर्षांपासून अक्षरशः चालणं झाली आहे. तसेच नेरळ बस स्थानकात ही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने प्रवाशांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. दिवसेंदिवस नेरळ बसस्थात अतिक्रमणे वाढत आहेत. परंतु हे रोखण्यात कोणाही यश येत नसल्याने नेरळ बस स्थानक अखेरची घटका मोजत आहे. याकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे याचा त्रास प्रवाशांना होत आहे. 
नेरळ बस स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण
कर्जत तालुक्यात नेरळ शहर महत्वाचे शहर मानले जाते. परंतु नेरळ शहरात रस्त्यांची अवस्था भयानक आहे.त्यातच नेरळ बसस्थाककडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चालणं झाली आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना आणि पादचाऱ्यांना ये- जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रुणांनाही त्रास सहन करावा लागत आहे.  परंतु दोन वर्षापासून या रस्त्याकडे लक्ष देण्यास कोलाही वेळ मिळत नाही. मागील सतत दोन वर्षे नेरळ मधील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी स्वखर्चातून खड्डे भरण्याचे काम केले होते.
हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून जिल्हा परिषद सदस्यांसह बांधकाम विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चालणं झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालक आणि पादचाऱ्यांकडून केली जात आहे.
नेरळ बस स्थानक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन दिवसात खड्डे भरले जातील. व रस्ता चांगला करण्यात येईल.  के. ए. केदार, उप अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग
या संदर्भात स्थानिक जिल्हा परिषद सदस्या अनुसया पादिर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत