नेरळ बाजारपेठेत दुचाकीची अनधिकृत पार्किंग

नेरळ -कांता हाबळे
नेरळ बाजारपेठेत दररोज मोठया प्रमाणात दुचाकीची अनधिकृत पार्किंग केली जात असून अस्तव्यस्त पद्धतीने वाहने रस्त्यावर लावली जात आहेत. मात्र याकडे वाहतुक पोलिसांसह नेरळ ग्रामपंचायतीचे दुर्लंक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
    नेरळ ही मुख्य बाजारपेठ असून अनेक गावांमधून नागरिक बाजारहाट करण्यासाठी येत असतात. परंतू बाजारपेठेत दुचाकी कशाही पार्क केल्याने मोठया नागरिकांना मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच बाजारहाट करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना ये-जा करणे कठीण होवून बसले आहे. पोलिसांनी मात्र बघ्याची भुमीका घेतली आहे. नेरळ वाहतुक पोलिसांनी मात्र नेरळ अंबिकानाका येथे बस्तान मांडले असून बाजारपेठेकडे दुर्लंक्ष केले आहे.
    काही महिन्यांपूर्वी नेरळ ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने बाजारपेठेत अनधिकृत पार्क केलेल्या वाहनांवर करवाईची मोहिम उभारली होती. वाहने उचलून पोलीस स्टेशनला नेली जात होती.  परंतू ही कारवाई थंडावली असल्याने नेरळ बाजारपेठेत मोठया प्रमाणात अनधिकृत पार्किंग केली जात आहे. असे असताना कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. रस्ते रूंद होवूनही भर बाजारपेठेत गाडयांची पार्किंग केली जात आहे. त्यामुळे रस्ते वाहनांसाठी की, नागरिकांसाठी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ पोलिसांनी पुढाकार घेवून या अनधिकृत दुचाकींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली आत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत