नेरळ बाजारपेठ पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात; दोनदा अतिक्रमण जमीनदोस्त करून देखील पुन्हा अतिक्रमणे  

नेरळ : अजय गायकवाड

मध्य रेल्वे मेन लाईन वरील नेरळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या बाजारपेठेत रस्त्यावर केलेले अतिक्रमणे आतापर्यंत दोनवेळा जमीनदोस्त करण्यात आली होती. मात्र अतिक्रमणे करून रस्त्यावर दुकाने थाटणारे यांना कोणतेही भय राहिले नाही आणि त्यामुळे आता तिसऱ्यांदा रस्त्यावर अतिकारणे झाली आहेत. दरम्यान, रस्त्याची मालकी असलेले रायगड जिल्हा परिषद आणि ताबा असलेल्या नेरळ ग्रामपन्चायतचे कोणतेही नियंत्रण नाही असे दिसून येत आहे.

नेरळ रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बाजारपेठेची निर्मिती रेल्वे मार्गाच्या बाजूला रस्त्यावर आणि गटाराच्या वर बांधली होती. नेरळ मधील सामाजिक कार्यकर्ते माधव गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यावर जानेवारी २००८ मध्ये नेरळ बाजारपेठ मधील रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम खात्याने जमीनदोस्त केली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने तेथे गटारे बांधण्याचे काम वर्षभर केले नाही आणि त्यामुळे त्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण करून दुकाने थाटली गेली.जिल्हा परिषद सदस्य सुरेश टोकरे हे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी नेरळ गावातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकस प्राधिकरण कडून निधी मंजूर करून आणला. त्या २३ कोटींच्या निधीमधून नेरळ बाजारपेठ मधील रस्त्यांची कामे करण्यासाठी पुन्हा एकदा डिसेंबर २०१७ मध्ये नेरळ रेल्वे स्टेशन जवळील बाजारपेठ मधील अतिक्रमणे नेरळ ग्रामपन्चायत कडून तोडण्यात आली.

दीड वर्षे रस्त्याचे काम चालले आणि नेरळ बाजारपेठेतील रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनला,सोबत रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या गटारांवर पेव्हर ब्लॉक बसवून फुटपाथ देखील तयार करण्यात आला. हीच संधी साधत नेरळ बाजारपेठेत लोकांना चालण्यासाठी बनविण्यात आलेले फुटपाथ दुकानदार यांच्यासाठी आपली दुकाने थाटण्याचे ठिकाण बनले आहे. नेरळ रेल्वे स्टेशन पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एका बाजूला १०० टक्के फुटपाथ व्यवसायिकांनी व्यापला आहे. तर समोरील अर्धा फुटपाथ देखील अतिक्रमणं करून गिळला आहे. त्या अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार आणि व्यवसायिक यांना कोणतेही भय राहिले नसून नेरळ ग्रामपन्चायत चे अधिकार असून देखील झालेले अतिकारण काढण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. त्यात आता सर्व दुकानदारांनी रस्त्याच्या फुटपाथ वर अतिक्रमण करतानाच त्या ठिकाणी प्लास्टिक चे शेड देखील बनधले आहेत. त्यात केवळ नेरळ येथील नाही तर मुरबाड,अंबरठा तालुक्यातील व्यवसायीक रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत.   हे अतिक्रमणे दूर व्हावेत यासाठी अनेकदा नेरळ संघर्ष समितीने उपोषणे देखील केली आहेत,पण त्याचे ना भय अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना आणि ना काळजी नेरळ ग्रामपन्चायतला अशी नेरळ मधील रस्त्याची झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बाजारपेठेतील अतिक्रमणे दूर करण्यात आली. मात्र त्यानंतर अनेकदा कारवाई होऊन देखील रस्त्यावरील अतिक्रमणे आहेत तशीच आहेत.दुसरीकडे त्या नवीन रस्त्यांवर पादचारी यांना चालण्यासाटःई फुटपाथ बांधला आहे. त्यावर दुकाने थाटली आहेत. हे फक्त नेरळ मध्येच घडू शकते,कारण नागरिकांनी उपोषणे करून देखील काहीही फरक पडत नाहीत आणि अतिक्रमणे आहेत तशीच आहेत हे सुद्धा दिसून येते.

– ( माधव गायकवाड- संघर्ष समिती )

नेरळ बाजारपेठ मधील रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे यांच्याकडून नेरळ ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची कर आकारणी केली जात नाही. मात्र मागील मासिक सभेत त्या अतिक्रमण बाबत चर्चा झाली असून त्या टपरी धारक आणि टोपलीवाले यांच्याकडून दैनंदिन पावती फेडण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

– ( गणेश गायकर- ग्रामविकास अधिकारी नेरळ ग्रामपन्चायत )

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत