नेरळ मधील दिलकप महाविद्यालय विद्यार्थ्यांनी बंद पाडलं !

नेरळ : अजय गायकवाड 

नेरळ ममदापुर येथील दिलकप महाविद्यालय आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने दणाणून गेले. महाविद्यालयाच्या प्रशासनाने अवाजवी फी वाढ केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आंदोलन केले. 

नेरळ मधील दिलकप महाविद्यालय विद्यार्थ्यांनी बंद पाडलं !
कॉलेज प्रशासन विकास शुल्क, संगणक शुल्क, स्टेशनरी फी अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. अनेक प्रकारचे शुल्क घेऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना कोणतेही शैक्षणिक सुविधा नसल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आज विद्यार्थी आक्रमक झाले. त्यांच्या आंदोलनाला युवासेनेचे साथ मिळाली आणि विद्यार्थ्यांनी हे अवाजवी आणि अन्यायकारक शुल्क कमी केल्याशिवाय कॉलेजचे कामकाज होऊ न देण्याचा निर्धार करत आज कॉलेज बंद पाडले. यासाठी शेकडो विद्यार्थी एकवटले. युवासेनेचे कर्जत तालुका चिटणीस प्रथमेश मोरे आणि कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात जाऊन याबद्दल कॉलेज प्रशासनाला जाब विचारला.
या प्रकरणाची दाखल घेऊन आता उद्या शिवसेनेचे सिनेट सदस्य दिलकप महाविद्यालयात येणार आहेत. या प्रकरणात आता कोणता तोडगा निघतो हे उद्या होणाऱ्या चर्चेनंतरच स्पष्ट होणार आहे. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत