नेरळ रेल्वेस्थानक पाण्याखाली, दहिवली पुलावर धोक्याची घंटा

नेरळ : कांता हाबळे

सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे  नेरळ स्थानकातील फलाट क्रमांक तीन पाण्याखाली आला आहे. तर कळंब-नेरळ जिल्हा मार्गावरील दहिवली पुलावरून पाणी जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सकाळी अनेक चाकरमानी कामावर न जाता घरी परतले तर नेरळ ला शाळेत जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहेत तर नेरळशहरातील रस्ते ही जलमय झाले आहेत.
दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी या पुलावरून पाणी जात असते, हा पूल धोकादायक झाला आहे. तर अनेक वर्षांपासून पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असताना स्थानिक प्रशासन तसेच बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षांपूर्वीचा हा पूल असल्याने दहिवली पूल म्हणजे धोक्याची घंटा झाली आहे. सतत च्या तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शनिवारी सकाळच्या सुमारास पाणी गेल्याने सुमारे 4 तास हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेक प्रवासी, विद्यार्थी यांचे नुकसान तर अनेकांचे चांगलेच हाल झाले.
तसेच नेरळ रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. माथेरानला जाण्यासाठी जगभरातून पर्यटक या रेल्वे स्थानकात उतरून माथेरानला जात असतात, त्यामुळे नेरळ रेल्वे स्थानकाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे आहे. असे असताना मात्र नेरळ स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना प्रशासनाकडून कोणत्याही सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत. या स्थानकात मोठ्या प्रमाणात सुविधांचा वानवा आहे. याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळत नाही. त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात दररोज हजरो प्रवासी ये-जा करत असतात, परन्तु या स्थानकात अर्धवट पूल, अर्धवट निवारा शेड, स्वछता गृहाची कमतरता अशा अनेक सुविधांचा अभाव आहे. असे असताना दुसरी कडे रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थाकात सरकता जिना उभारण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पहिल्यांदा स्थाकात प्रवाशांना योय त्या सोयी सुविधा मग सरकता जिना उभारा अशी मागणी आता प्रवासी करत आहेत. 
सतत चार दिवसाच्या पावसामुळे नेरळ स्थानक, नेरळ बाजारपेठ, तसेच अनेक सकळ भागात पाणी साचल्याने नागरिक प्रवासी व विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झालेले पाहायला मिळाले
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत