लवकरच सरकत्या जिन्यासाठी निविदा काढणार, रेल्वे प्रशासनाची माहिती
नेरळ : कांता हाबळे
रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्यासाठी तीन – चार महिन्यात निविदा निविदा निश्चित करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता नेरळ रेल्वे स्थानकात लवकरच सरकत्या जिन्याची उभारणी करण्यात येणार असल्याने प्रवाशांची उत्सुकता वाढली आहे. नेरळ रेल्वे स्थानकात मुंबई कडील पादचारी पुलाचे काम ठेकेदाराच्या वाद विवादमुळे रखडले असून या पुलासाठीचे खांब गेल्या आठ – दहा वर्षांपासून उभे केले आहेत.
मध्य रेल्वेचे नेरळ स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते, माथेरानला जाण्यासाठी जगभरातील पर्यटक नेरळ स्थानकातून जात असतात , त्यामुळे नेरळ स्थानक हे माथेरानचाच एक भाग असल्याने नेरळ स्थानकाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा नेरळ स्थानकात सुविधांचा मात्र वानवा आहे. नेरळ रेल्वे स्थानकात काही वर्षा पूर्वी मुंबई कडील पुलाच्या कामाला सुरुवात केली होती. त्या करिता दोन्ही फलाटवर खांब सुद्धा उभे केले आहेत परंतु त्या नंतर काम थांबले ते आजपर्यंत. यापुलाचे काम कधी पूर्ण होईल याबाबत सातत्याने प्रवाशांकडून विचारणा होत आहे.
याबाबत पुलाचे काम कधी पूर्ण होईल? अशी विचारणा कर्जतचे रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनास केली. त्यावर रेल्वे प्रशासनाने सदर पुलाचे काम ठेकेदाराशी वाद विवाद झाल्यामुळे रखडले आहे असे उत्तर देण्यात आले आहे. मात्र आनंदाची बाब अशी की नेरळ स्थानकात उभारलेल्या नवीन पुलाच्या मुंबईकडील बाजूस सरकता जिना होणार असून त्याबाबत येत्या तीन – चार महिन्यात निविदा निश्चित करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे..
‘नेरळ स्थानकात ठेकेदाराच्या वाद- विवादामुळे रखडलेले जिन्याचे काम लवादा कडून लवकर निर्णय होऊन सुरू झाले पाहीजे यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत. नेरळ स्थानकात सरकता जिना होत आहे ही बाब अभिनंदनीय आहे.’– पंकज मांगीलाल ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत
शेयर करा
This work should done so late but no matter this will complete in time thanks to everyone who take effort for this work…..