नेरळ विकास संघर्ष समितीच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात

नेरळ : कांता हाबळे 

नेरळ विकास संघर्ष समितीने नेरळ ग्रामपंचायतच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नेरळ विकास संघर्ष समितीने दोन वर्षांपासून नेरळ ग्रामपंचायत, आणि पंचायत समिती कर्जत ,अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही ग्रामपंचायतीचे याची दखल न घेतल्याने हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. हे उपोषण कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून नेरळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

नेरळ मधील नेरळ विकास संघर्ष समितीने गेली दोन वर्षांपासून पंचायत समिती कडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच अनेक ग्रामसभेत विषय मांडले आहेत. परंतु गतामपंचाय तिने फक्त तोंडी आश्वासने दिली आहेत. त्यामुळेच गेल्या महिन्यात हा उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ मधील जिल्हा परिषद सदस्या अनुसया पादिर यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रायगड जिल्हा परिषदेने  नेरळ च्या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय सुचवले व आर्थिक मदत जाहीर केली असल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणणे असून परंतु अद्याप नेरळ ग्रामपंचायतीने ठोस कार्यवाही केली नाही.व 15 ऑगस्ट च्या ग्राम सभेत विषय मांडूनही पंचायत समितीच्या कोणतीही समस्या सोडवली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव नेरळ विकास संघर्ष समितीने हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
यामध्ये नारायण सुर्वे, दादा गायकवाड, रामचंद्र मोरे, वि. ल. पाटील, महेंद्र शिंदे , बाळा शेख, गोविंद बारणे, माधवराव गायकवाड, हिरू भोईर आदी सदस्य उपोषणाला बसले आहेत .
नेरळ शहरात रस्त्यावरील मटण मच्छी उघडी दुकाने स्थलांतरित करणे, फुटपाथ वरील अतिक्रमण दूर करणे व रेलिंग करणे, रस्त्यावरील अडथळे ठरणारे विजेचे पोळ दूर करणे, वाहतूक कोंडी दूर करणे, 14 वित्त आयोगाची कामांची चौकशी करून कार्यवाही करणे, डम्पिंगची समस्या,शून्य कचरा संकल्पना राबविणे, एम एम आर डी ए च्या रस्त्यांची चौकशी करणे, पडलेली जिल्हा परिषद शाळा त्वरित बांधणे आदी समस्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. पोषणाचा पहिला दिवस असल्याने अनेकांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे. व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने या उपोषण जाहीर पाठिंबा दिला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत