नेवरूळ ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण कायम स्वरुपी सोडवणार : अनंत गीतेचे आश्वासन

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळा तालुक्यातील नेवरूळ ग्रामस्थांना वर्षामध्ये फेब्रृवारी ते जुन महिन्यापर्यत पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आश्वासन दिले आहे. यासाठी नेवरुळ येथील ग्रामस्थांनी ना.गितेंची ५ ऑगस्ट रोजी मुंबई येथील कार्यालयात त्याची भेट घेतली होती.

पिण्याच्या पाणी योजनेसाठी सन २०१२ साली भारत निर्माण योजने अंतर्गत २३ लक्ष रूपये मंजुर करण्यात आले होते.तत्कालीन उपसभापती रवींद लाड यांनी स्वता ५ टक्के लोकवर्गणी भरूण ही योजना राबवली होती. मात्र नेवरूळ ग्रामपंचायत शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यानंतर या योजनेचा बोजवारा उडाला. अपुरी साठवण टाकी, नादुरुस्त अंतर्गत पाईपलाईन यामुळे ग्रामस्थांना वर्षातून काही महिने पाण्यासाठी सर्व कामे सोडून पायपीट करावी लागते. ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी हि पायपीट कायमस्वरूपी थांबावी यासाठी नेवरूळचे मूंबई शाखा प्रमूख श्री.नयन दत्ताराम कासार, सल्लागार श्री.संतोष लाड, श्री.सूशांत लाड या ग्रामस्थांनी केंदियमंत्री ना. श्री.अंनत गिते यांची मुंबई येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली व पाण्याची समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनामुळे ना.गिते यांनी तत्काळ आपल्या खासदार फंडातून निधी देण्या बाबत सुचना केल्याची माहिती सुशांत लाड यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत