नेहरूऐवजी जिना पंतप्रधान असते तर भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती: दलाई लामा

रायगड माझा वृत्त :

नेहरूऐवजी जिना पंतप्रधान असते तर भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती असे वक्तव्य तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी मंगळवारी केले आहे. गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी विद्यार्थांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

एका विद्यार्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना दलाई लामा म्हणाले की, ‘महात्मा गांधी मोहम्मद जिना यांना पंतप्रधान करणार होते. पण नेहरू यांना ते मान्य नव्हते.  ते आत्मकेंद्रीत होते.  नेहरू यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी महात्मा गांधी यांनी नेहरू यांना पंतप्रधान केले. त्यावेळी जिना पंतप्रधान झाले असते तर भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती.’

आणखी एका विद्यार्थ्याने दलाई लामा यांना विचारले की, ‘अशा चुका न होण्यासाठी निर्णय कसे घेतले जावेत.’ याचे उत्तर देताना दलाई लामा म्हणाले की, ‘अशा प्रकारच्या चुका होतात.’

गोव्यातील सखाली येथे असलेल्या गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आधुनिक भारताचे पारंपारिक ज्ञान या विषयावर संभाषण देण्यासाठी आले होते. २५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटने तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना आमंत्रित केले होते. सात वर्षानंतर दलाई लामा यांनी गोव्यामध्ये उपस्थित राहिले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत