नैराश्येपोटी दोन युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

बुलढाणा : रायगड माझा वृत्त 
बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून यामुळे सर्वत्र  एकच खळबळ उडाली आहे.
बागलाण तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली तर सारदे येथील शेतकरी मनोज रामराव धोंडगे यांनी विष प्राशन करून आत्महत्या तालुक्यात दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.  कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या तात्याभाऊ यांनी कांद्याचे भाव कोसळल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
दुसऱ्या घटनेत सारदे  येथील कर्जबाजारी तरूण शेतकरी मनोज रामराव धोंडगे  यांनी शुक्रवारी   शेतात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालय दाखल केले होते. मात्र प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज  सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एका वर्षापुर्वीच त्यांच्या पत्नी व मुलाचे निधन झाले होते.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना चारा नाही तसेच विहिरींनीही तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करवी लागत आहे. बहुतांश शेतक-यांनी पाण्याअभावी कमी क्षेत्रात कांदा लागवड केली मात्र पाण्याअभावी लागवड केलेला कांदा सोडून देण्याची वेळ कांदा उत्पादनांवर येऊन ठेपली आहे. त्यातच आजमितीला कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आपल्या जिवाला वैतागले असल्याचे चित्र निर्माण झाले असून शेजाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी शासन अजून किती आत,आत्महत्यांची वाट पाहणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत