नोकरभरती विरोधात बँकेच्या आवारातच संचालकांचे उपोषण

नगर : रायगड माझा वृत्त

नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या नोकरभरती प्रकरणाचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. कोणालाही पत्र न देता परस्पररित्या भरती करण्याचा घाट घातल्यामुळे संतप्त झालेल्या काही संचालकांनी बँकेच्या आवारातच उपोषण सुरू केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माध्यमिक शिक्षक बँकेच्या 12 जागांसाठी नोकरभरती करायची होती. ही नोकरभरती करताना संचालक मंडळाने परस्परर आपल्या जवळच्या नातेवाईकांना स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले, त्यांना बोलावून अवघ्या काही तासांमध्ये त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, या नोकरभरतीचा तीन संचालकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यांनी बँकेच्या आवारातच उपोषणाला सुरुवात केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नोकरी प्रक्रिया न्याय प्रविष्ट असल्याने संचालक मंडळाने घाईगडबडीत निर्णय का घेतला याचा खुलासा करण्याचत यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत