नोकरीचे आमिषनोकरीचे आमिष दाखवून महिलेची 10 लाखांची फसवणूक  कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा : कर्जत मुद्रे येथील घटना

कर्जत : भूषण प्रधान
कर्जत शहरातील मुद्रे येथे राहणाऱ्या महिलेकडून एका इसमाने एका शाळेत नोकरी लावतो असे सांगत तिची फसवणूक केल्याची घटना कर्जत शहरात उघडकीस आली आहे. तिच्याकडून सुमारे 10 लाख रुपये उकळल्याचे समोर आले. यासंदर्भात सविता दिपक जगताप या महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्यात दाख केली असून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत कर्जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, मुद्रे येथील नेमीनाथ रेसिडेन्सी येथे राहणारी सविता दिपक जगताप हिला प्रसाद तानाजी थोरवे रा. उक्रूळ याने डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्याने या महिलेकडून सुमारे 10 लाख रुपये घेतले व त्यांना नोकरीस न लावता त्यांची फसवणूक केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.32/2018 भा.द.वि.स.कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत देशमुख हे करीत आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत