नोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे

रायगड माझा वृत्त 
नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित 25 वर्षीय तरुणी पश्चिम बंगालची रहिवासी आहे. ओडिशामधील पुरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला 10 दिवस मार्केट कॉम्प्लेक्स परिसरात कोंडून ठेवण्यात आलं होतं. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे.

तपासादरम्यान पोलिसांना पीडित तरुणीला काजल नावाच्या एका महिलेने नोकरी देण्याचं अमिष दाखवत एका वर्षापूर्वी ओडिशाला आणलं असल्याचं समजलं. मात्र नंतर त्या महिलेने आणि एका व्यक्तीने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्यासोबत अजून काही तरुणींना कोंडून ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावरही बलात्कार करण्यात आल्याचं तिनं सांगितलं आहे. पीडित तरुणीने कोंडून ठेवण्यात आलेल्या इमारतीच्या छतावरुन मदत मागितल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांना दरवाजा तोडून तरुणीची सुटका करत आपल्या ताब्यात घेतलं. तिला पुरी जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भाजपा आणि काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तरुणीची भेट घेतली असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत