नोटाबंदीचा भयंकर परिणाम, वर्षभरात एक कोटी बेरोजगार!

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर दोन वर्षे झाली आहेत. या काळात सरकारच्या हाती काहीच लागलेले नाही. ना काळा पैसा ना बनावट नोटा. उलट कोटय़वधी नोकरदारांनी आपली नोकरी गमावली आणि त्यांचे संसार देशोधडीला लागले. नोटाबंदीच्या या धक्क्यातून अवघा देश अद्यापही सावरलेला नाही हे ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ऑक्टोबर 2017 ते ऑक्टोबर 2018 या वर्षभरात तब्बल एक कोटी लोक बेरोजगार झाले असे ही आकडेवारी सांगते! सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी या ख्यातकीर्त आणि विश्वासार्ह संस्थेने ऑक्टोबरमधील बेरोजगारीचे सर्वेक्षण केले तेव्हा नोटाबंदीमुळे आजही लाखो जण बेरोजगार होत असल्याचे उघड झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये बेरोजगारीचा निर्देशांक दोन वर्षांतील सर्वात जास्त 6.9 टक्के एवढा होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत