नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!

अहमदाबाद : रायगड माझा 

भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोटांबदीच्या काळात गुजरातमधील सर्वाधिक जुन्या नोटांचा भरणा झाल्याचं समोर आलंय. या बँकेत तब्बल 745.59 कोटी रुपये जमा झालेत.

अमित शहांच्या बँकेसोबत भाजप नेते आणि गुजरातमधील मंत्री जयेश रदडिया संचालक असलेल्या राजकोट जिल्हा सहकारी बँकेत 693.19 कोटी रुपये जमा झालेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी नाबार्डकडून मागविलेल्या माहितीतून ही बाब उजेडात आली आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत