नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र नाही: इम्रान खान

कराची : रायगड माझा वृत्त 

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान उद्भवलेली युद्धसदृष्य स्थिती आणि भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका यामुळे इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी पाक संसदेमध्ये करण्यात आली होती. माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता.

या मागणीवर इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही. काश्मीरी जनतेच्या इच्छेनुसार जो व्यक्ती काश्मीरचा प्रश्न निकाली काढेल तो व्यक्ती या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असेल, असे त्यांनी ट्विट केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत