न्यायप्रविष्ठ जमीन व्यवहार करून घातला ५० लाखांचा गंडा

पनवेल : साहिल रेळेकर

पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आरोप

रजिस्टर कार्यालयातील अधिकाऱ्यांचे कनेक्शन असल्याची शक्यता

खरेदी केलेली जागा २ वर्षांनंतर तिसऱ्याच माणसांच्या नावे असल्याचे समोर

पोलीस ठाण्यात अर्ज करून अद्यापही गुन्हा दाखल नाही

पनवेल तालुक्यातील पाले खुर्द येथील एका प्लॉट मधील साडेचार गुंठे जागा तीसऱ्याच्या मालकीची असतानाही ती विक्री करून ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उलवेतील निशिकांत मोरे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज सादर केला. मात्र ४ दिवस उलटले तरी तळोजा पोलिसांकडून याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत निशिकांत मोरे यांनी अखेर पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेवून न्यायासाठी लढा पुकारला.

उलवे येथे राहणारे निशिकांत मोरे यांनी १७ जानेवारी २०१९ रोजी साडेचार गुंठयाचा प्लॉट खरेदी केला. याबाबतचा सातबारा, रजिस्टर कार्यालयातील सर्व नोंदी, जागेची मोजणी अशा सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. भविष्यकाळात उपयोगी पडणारी जागा म्हणून त्यांनी गुंतवणूक केली. मात्र तब्बल दोन वर्षानंतर ते याठिकाणी गेले असता सदर जागा ही तिसऱ्याच माणसांच्या नावे असल्याचे समोर आले.

या जागेमध्ये सन १९९२ सालापासून न्यायालयीन लढाई ही श्री. दाभणे आणि श्री. भोसले यांच्यामध्ये सुरू होती. मात्र त्यानंतर सदर जागा गेल्या ३० वर्षांमध्ये वेगवेगळ्या लोकांना विकण्यात आली. एकूण साडेआठ एकर जागेमध्ये जवळपास १५० जणांना ही जागा विकण्यात आली. मात्र २०२० मध्ये न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी झाली आणि सदर जागा ही भोसले यांची असल्याचे सिद्ध झाले. प्रत्यक्षात जागा ही भोसले यांची होती तर मग ही जागा विकणारे मोकाट का ? याठिकाणी सातबारा नोंदी करणारे अधिकारी कोण ? सब रजिस्टर कार्यालयातील कोणत्या अधिकाऱ्यांनी खरेदीखत केले ? असे प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे ज्या निशिकांत मोरे यांची या जागा खरेदी प्रकरणात फसवणूक झाली आहे त्या नसीम अब्दुल रज्जाक मुल्लानी यांच्या विरोधात त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला. मात्र तळोजा पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नसल्याचा आरोप मोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत