न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

नवी दिल्ली:  रायगड माझा वृत्त 

न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी देशाचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. न्या. गोगोई यांचा कार्यकाळ १३ महिन्यांचा असणार आहे. ते नोव्हेंबर २०१९मध्ये निवृत्त होतील.

गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने न्या.गोगोई यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावली होती. मुळचे आसामचे असलेले गोगोई यांच्या नेतृत्वाखाली एनसीआर खटल्याची सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयातील अनेक महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.

१८ नोव्हेंबर १९५४मध्ये जन्मलेल्या गोगोई यांनी १९७८मध्ये वकीली सुरु केली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारी २००१मध्ये त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आली. ९ सप्टेंबर २०१० रोजी न्या.गोगोई यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. १२ फेब्रुवारी २०११मध्ये ते मुख्य न्यायाधीश झाले. त्यानंतर २३ एप्रिल २०१२ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत