न्यायालयाचा कंगनाला दणका; अनधिकृत बांधकामांविषयी दिलासा नाही

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

बिकिनी पोस्ट पर ट्रोल करने वालों को कंगना रनौत का जवाब, '...तो तुम्हारा  क्या होगा?' - Kangana Ranaut Reply to Trolls on Bikini Photo Twitter  Culture Compares with Maa Bhairawi tmov - AajTak

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला दिंडोशी दिवाणी न्यायालयाने दणका दिला आहे. कंगनाने खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रीझ इमारतीतील पाचव्या मजल्यावरील तीन फ्लॅट्सचे एकत्रिकरण केले होते. या वाढीव बांधकामाला न्यायालयाने अनधिकृत असल्याचं सांगितलं आहे.  ही अनधिकृत बांधकामे तोडण्याविषयी महापालिकेने २०१८ मध्ये तोडकामाचा आदेश बजावला होता. तो आदेश रद्द करण्यासाठी कंगनाने अर्ज केला होता. मात्र तो अर्ज दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी मंगळवारी फेटाळून लावला.

कंगनाला या आदेशाला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने कंगनाला 6 आठवड्याची वेळ दिला आहे. जर कंगनाने 6 आठवड्यात काही पाऊलं नाही उचललीत तर कंगनाच्या बांधकामावर हातोडा पडण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत