पंकजा मुंडेंना एक तासासाठी तरी मुख्यमंत्री बनवा – शिवसेना

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तर ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते’, असे विधान केले. विधानांचा आधार घेत शिवसेनेने सामनामधून पंकजा मुंडेंना एक तासासाठी तरी मुख्यमंत्री बनवा असा उपरोधिक टोला  मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

 

संग्रहित छायाचित्र

नक्की ‘सामना’च्या अग्रलेखात काय म्हटले आहे :

मराठा आरक्षणाचे राजकारण होऊ नये व समाधानकारक तोडगा निघायला हवा, असे आज कुणाला वाटत नाही? पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे, नुसते सांगितले नाही तर शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे की, ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल.

मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर सौ. पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. पंकजाताईंची भूमिका समजून घेतली पाहिजे. त्या जे बोलत आहेत त्यात राजकारण आहे असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत