पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट

पंढरपूर : रायगड माझा वृत्त 

Image result for pandharpur high alert

देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट देण्यात आला आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या चार चाकी वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अत्यंत गरजेच्यावेळी या वाहनांची कसून तपासणी करूनच मंदिर परिसरात सोडण्यात येत आहे.

मंदिरात प्रवेश करतानाही दारातून मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग मशीनच्या तपासणीतूनच भाविकांना मंदिर प्रवेश करता येत आहे. मंदिराच्या सर्व प्रमुख द्वारांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मंदिरातही पोलीस व मंदिर सुरक्षा रक्षक सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून आहेत. यासर्व सुरक्षा व्यवस्थांचा भाविकांना थोडा त्रास होत असला तरी सध्या परिस्थितीमुळे भाविकांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत