
देशाच्या राजकारणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल असा शरद पवार यांच्या तोडीचा एकही नेता नाही. शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यांच्या नावाला सहसा कोणी विरोध करणार नाही अशी परिस्थिती आहे. मोदींविरोधात लढण्यासाठी त्यामुळेच शरद पवारांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आधीच हे राजकीय वारं ओळखलं होतं का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनापूर्वी कर्जत येथे झालेल्या चिंतन बैठकीत त्यांनी शरद पवार हे आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे, अशी घोषणा केली होती. प्रफुल्ल पटेल यांची ही घोषणा शरद पवार यांना ती मुळीच पटली नव्हती. मात्र सध्याचं राजकीय वारं पाहता प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवलेलं भविष्य खरं होण्याची शक्यता दिसतेय.
शरद पवार यांनी काँग्रेस मध्ये येऊन पंतप्रधान पदावर दावा करावा अशी काँग्रेसची पहिली भूमिका असले तर स्वतःच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व ठेऊन पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे याकडेच शरद पवार यांचा कल राहील. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही करतील. त्यासाठी विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या एखाददुसऱ्या जागेवरून काँग्रेस बरोबरच संघर्ष टाळावा लागेल.
पंतप्रधान पदाने महाराष्ट्राला नेहमीच हुलकावणी दिली आहे त्यामुळे ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ या ओळी सार्थ ठरवायच्या असतील तर यावेळी भक्कम पणे व्ह्यूरचना करावी लागेल आणि ती कशी करावी हे शरद पवार यांच्याशिवाय कोण अधिक जाणेल?
व्हिडीओ बातमीसाठी क्लिक करा