पंतप्रधान देणार देशाला मोठी भेट; एक सप्टेंबरला होणार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकची सुरुवात

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सप्टेंबरला भारतीयांसाठी एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहेत. 1 सप्टेंबरला बहुप्रतिक्षित इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) ची सुरुवात होणार आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात या बँकेची कमीत कमी एक शाखा असणार आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये आर्थिक सेवांवर अधिक लक्ष दिलं जाऊ शकतं.

पंतप्रधान मोदी 1 सप्टेंबरला देणार देशाला मोठी भेट

21 ऑगस्टला होणार होतं उद्घाटन

सूत्रांच्या माहितीनुसार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकची सुरुवात एक सप्टेंबरला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याची सुरुवात होणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्यामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे 21 ऑगस्टला या योजनेचं उद्घाटन नाही झालं.

गावा-गावात असणार बँक

आयपीपीबीला देशभरातील 1.55 लाख पोस्टऑफीसमध्ये पोहोचवलं जाणार आहे. याच्या माध्यमातून बँकिंग आणि आर्थिक सेवा ग्रामीण भागात पोहोतणार आहे. सरकार या वर्षाच्या शेवटपर्यंत 1.55 लाख पोस्ट ऑफीसमध्ये आयपीपीबी सेवा जोडणार आहे. यामुळे  देशातील ग्रामीण भागात मोठं बँकींग नेटवर्क तय़ार होणार आहे.

11 हजार पोस्‍टमन देणार बँकिंग सेवा  

आयपीपीबीचे सीईओ सुरेश सेठी यांनी म्हटलं होतं की, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 650 शाखेसह लवकरच अस्तित्वात येणार आहे. याशिवाय देशभरात 3,250 पोस्ट ऑफीच्या माध्य़मातून बँकींग सेवा देखील मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात जवळपास 11,000 पोस्टमन सरळ तुमच्या घरापर्यंत बँकिंग सेवा देणार आहेत.

17 कोटी पोस्‍टल बचत खाते उघडणार

आयपीपीबीला 17 कोटी पोस्टल बचत खाते सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आयपीपीबीसह काम सुरु केल्यानंतर ग्रामीण भागात लोकांना डिजिटल बँकिंग आणि आर्थिक सेवा मिळणार आहे. मोबाईल अॅप आणि पोस्ट ऑफीसमध्ये जावून तुम्ही ही सेवा घेऊ शकता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत