पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मेरठ महामार्गाचे लोकार्पण

नवी दिल्ली :रायगड माझा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मेरठ महामार्ग आणि इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेचे लोकार्पण करण्यात आले. मोदींनी रोड शो करुन दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेचे उद्धाटन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील हा महामार्ग त्यांच्या वाढदिवशीच प्रत्यक्षात उतरला आहे.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या दिल्ली विभागातील 9 किलोमीटर लांबीच्या पहिल्या सत्राचं (निझामुद्दीन ब्रिज ते दिल्ली-यूपी सीमा) उद्घाटन आज करण्यात आलं. दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे हा देशातील पहिला 14 पदरी महामार्ग आहे. पाच फ्लायओव्हर, चार अंडरपास आणि चार फूटओव्हर ब्रिज अशी या महामार्गाची रचना आहे. यमुना नदीवरही दोन पूल बांधण्यात आले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत