पंतप्रधान मोदींचं लुटीला प्रोत्साहन: राहुल गांधी

नवी दिल्ली:  रायगड माझा वृत्त
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा तोफ डागली. ‘प्रत्येक संरक्षण करारात भ्रष्टाचारविरोधी अटी-शर्ती असतात. पण पंतप्रधान मोदींनी राफेल करारातील अटी व शर्ती वगळल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय. पंतप्रधान मोदी हेच लुटीला प्रोत्साहन देत आहेत हे यावरून स्पष्ट होतंय,’ असं राहुल म्हणाले.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू हे दिल्लीतील आंध्र भवनात उपोषणाला बसले आहेत. त्यांना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. राहुल गांधी यांनीही आंध्र भवनमध्ये जाऊन नायडूंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. मी आंध्र प्रदेशातील नागरिकांच्या सोबत आहे. हे पंतप्रधान कसे आहेत? त्यांनी आंध्र प्रदेशच्या नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. मोदी जिथे जातात, तिथे खोटं बोलतात. आता त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असं राहुल म्हणाले. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही नायडू यांची भेट घेतली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत