पंतप्रधान मोदींना संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘द चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार

संयुक्त राष्ट्रसंघ : रायगड माझा ऑनलाईन

 

संयुक्त राष्ट्रसंघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह हा पुरस्कार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना सुद्धा याच पुरस्काराने गौरविण्यात आले. धोरण नेतृत्वाच्या श्रेणीमध्ये मोदी व फ्रान्सच्या मॅक्रोन यांना या सन्मानासाठी संयुक्तपणे निवडण्यात आले.

देशाला २०२२ पर्यंत  प्लास्टिक मुक्त करण्याच्या महत्वपुर्ण उपक्रमासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या नेतृत्वाखाली मोदी यांना ‘द चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याशिवाय पाच अन्य व्यक्ती आणि काही संघटनांना सन्मानित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमांर्तगत “यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांनी, धैर्यवान, नवकल्पना आणि आजच्या काळातील काही महत्वाच्या पर्यावरणीय समस्यांशी निगडित प्रश्नांवार इतर देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत