पक्षी वाचवा अभियानास चेतन उतेकर यांचा मदतीचा हात 

महाड : मयुरी खोपकर

महाड मधील फ्रिडम ग्रुपच्या वतीने एप्रिल महिन्यापासून पक्षी वाचवा अभियान सुरु करण्यात आले होते. या अभियानचे स्वागत करीत महाडमधील चैतन्य सेवा संस्थेचे संस्थापक चेतन उतेकर यांनी मदतीचा हात देत पक्षांसाठी १०० लाकडी घरटी दिली आहेत.  ४२ अंशावर पोहचलेल्या तापमानाचा  पारा उन्हाच्या तडाख्याने कमी होत चाललेला पाणी साठा करपून निघणारी पिके , माणसांनाही नको करणारा  उष्मा असे वाटत असताना लहान लहान पक्षांची अवस्था यापेक्षाही वाईट होत आहे त्यांना ठिकठिकाणी अन्न व पाoयाची सोय करण्याच्या दृष्टीने  महाडमधील फ्रिडम ग्रुपने पक्षी वाचवा अभियानाची सुरुवात केली आहे.
   
   फ्रिडम ग्रुपने पक्षी वाचवा अभियानाच्या माध्यमातून आवाहन करताच महाडकर नागरिक देखील पुढे सरसावले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून महाडमधील मधील चैतन्य सेवा संस्थेचे संस्थापक चेतन उतेकर यांनी या अभियानात  सहभाग घेत पक्षांसाठी १०० लाकडी घरटी व धान्य दिले आहे.यावेळी चेतन उतेकर यांनी या पक्षी वाचवा अभियानास लागेल ते सहकार्य करू तसेच फ्रिडम ग्रुपचा हा उपक्रम कौतुकास्पद असून पक्षांना जीवदान देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.  चैतन्य सेवा संस्था हि महाडमधील विविध  सामाजिक उपक्रम राबवित असते.

  ‘ पक्षी वाचवा ‘ जन जागृती अभियानामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यातून आणखी काही नागरीक पुढे येतील अशी अपेक्षा फ्रिडम ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली. तसेच या अभियानात लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाला. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत