पक्ष आणि घरातूनच मिळू शकतो तटकरेंना झटका…

 

अलिबाग : रायगड माझा वृत्त

कोकण स्थानिक प्राधिकारी विधान परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत यांना उमेदवारी दिली. पुत्राच्या विजयासाठी सुनील तटकरे यांनी स्वाभिमान, शेकाप, मनसे या पक्षांचा पाठींबा मिळवला. परंतू पक्षातील कलह त्यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची भीती आहे. अनिकेत यांचा अर्ज भरताना माजीमंत्री भास्कर जाधव, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, विद्यमान आमदार अनिल तटकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

 

भास्कर जाधव आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये कोकणच्या नेतेपदावरून वाद सुरू आहे. जाधवांचे पुत्र विक्रांत हे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत. अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरताना दोघेही अनुपस्थित होते.दरम्यान या अनुपस्थितीचा विक्रांत जाधव यांनी खुलासा केला आहे. 

विधान परिषदेच्या निवडणूकीत आम्ही अनिक तटकरे यांचेच काम करणार आहोत. आम्ही कोणावरही नाराज नाही. मतदार संघातील नियोजित कार्यक्रमामुळे उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहता आले नाही. -विक्रांत जाधव,  विरोधी पक्षनेते रत्नागिरी जिल्हा परिषद 

सध्या अनिल तटकरे या मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची मुदत जूनमध्ये संपत आहे. अनिल तटकरे यांचा पत्ता कापून राष्ट्रवादीने त्यांच्या पुतण्याला संधी दिल्याने ते प्रचंड नाराज आहेत. अनिल  तटकरे यांचा पत्ता कट होण्यामाध्ये कुटुंबातील अंतर्गत वादाचे कारण असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तटकरे कुटुंबियातील वाद संपला असे जाहीर करण्यात आले होते. मात्र या दोघांची अनुपस्थिती वेगळेच सांगत आहे. अनिल तटकरे यांच्यासह खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता मसूरकर विधान परिषदेसाठी इच्छुक होते. त्यांनी अनेकांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. संधी न मिळाल्याने तेही नाराज आहेत. पक्ष आणि घरातील नाराजी वेळीच दूर झाली नाही तर विजयाची मॅजिक फिगर गाठताना तटकरेंची डोकेदुखी वाढणार आहे. 

व्हिडीओ बातमी :

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत