पतीचे भावजयीशी अवैध संबंध, विवाहितेने चिडून चिमुरड्यांची केली हत्या, स्वत:ही घेतला गळफास

रायगड माझा वृत्त 

शिवपुरी – पतीच्या भावजयीशी असलेल्या अवैध संबंधांमुळे त्रस्त होऊन विवाहितेने आपल्या दीड वर्षांचा मुलगा अन् 3 वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि स्वत:ही गळफास घेतला. तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही भयंकर घटना सोमवारी सुभाषपुरा परिसरातील मुढ़खेड़ा गावात घडली.

असे आहे प्रकरण

सूत्रांनुसार, मीरा चतुरसिंह मोगिया (24, रा. मुढखेड़ा) आपल्या दोन मुलांना – पूनम (3) आणि छोटू (दीड वर्षे) सोबत घेऊन घरापासून 500 मीटर अंतरावर जंगलात गेली. येथे तिने आपली साडी फाडून दोन्ही मुलांच्या गळ्यात फास टाकला व झाडाला लटकावले. त्यांचा तडफडून मृत्यू झाल्यानंतर स्वत:ही गळफास घेतला. सुभाषपुरा पोलिस स्टेशान प्रभारी सुरेन्द्रसिंह यादव म्हणाले की, गावातील एक महिला जळतण गोळा करण्यासाठी जंगलात गेली तेव्हा तिला माय-लेकरांचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. ही घटना उजेडात आल्यावर पती आढळला नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.

रात्री पतीशी झाले होते भांडण:
पोलिसांनी सांगितले की, मीरा तिचा पती चतुरसिंहचे भावजयीशी असलेल्या अवैध संबंधांवरून नेहमी भांडण करायची. रविवारी रात्रीही दोघांमध्ये याच मुद्द्यावरून भांडण झाले. यावरून नाराज झालेल्या मीराने हे पाऊल उचलले. दरम्यान, तिघा मायलेकरांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत