पती पत्नीच्या सततच्या भांडणातून वैतागलेल्या पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या

 

अंबरनाथ : अजय गायकवाड
मयत पत्नीचे नाव पूजा कैलास आतकीरे(44) असून आरोपी पती याचे नाव कैलास बंडू आतकीरे(45)असे आहे. आरोपी पतीला शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहिती नुसार अंबरनाथ शहराच्या पूर्वेकडील भागात राहणाऱ्या ग्रीन सिटी येथील ही घटना आहे.आरोपी कैलास बंडू आतकीरे याचे आपल्या पत्नी बरोबर सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होत असत. तर पत्नीचे आपल्या मुलाबरोबर देखील वागणे बरोबर नसल्याचे पती कैलास याने सांगितले असून मोठा मुलगा प्रणव हा वाईट सवाईच्या मार्गावर लागून तो व्यसनाधीन झाला होता. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी पत्नी पूजा हिच्या बरोबर पुन्हा बाचाबाची झाली होती या सततच्या कट-कटीला कंटाळून तिचा गळा दाबला असता, गुदमरून ती खाली पडली, तिला स्वास न मिळाल्याने तिचा गुदमरून जागीच मृत्यू झाला होता. अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलिसांनी पती कैलास याला ताब्यात घेतले तर पती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या बाबत पोलीस ठाण्याचे व.पु.नि मनजीत सिंग बग्गा हे अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत