पत्नीच्या प्रियकराच्या धमक्यांना घाबरून पतीची आत्महत्या, मोबाईल सुरु ठेवून घेतला गळफास

मुंबई : रायगड माझा

ताडदेवमध्ये एका तरुणाने पत्नीच्या प्रियकराकडून वारंवार मिळणा-या धमक्यांना कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करत असताना मोबाईल सुरु ठेवून त्याचा व्हिडिओ बनवला. मयूर गोहील (34) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

मयूर चे 2004 मध्ये प्रितीशी लग्न झाले. त्यांना दोन मुलेही आहेत पण काही महिन्यांपासून प्रितीचे मयूरशी खटके उडू लागले होते. त्याला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकूण लागली होती. त्याने त्यांचे फोनवरचे बोलणे एेकल्यानंतर पत्नीला याचा जाबही विचारला होता. त्यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यानंतर त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यातून कसाबसा वाचला होता.

पण यानंतरही प्रितीचे वागणे बदलले नाही. तिचे विवाहबाह्य संबंध सुरुच होते. तसेच प्रितीचा प्रियकर व त्याचे मित्र त्याला नेहमीच धमकावत होते. या सगळ्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी मयूरने आत्महत्येचा मार्ग निवडला. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडिओ बनवला असून त्यात त्याने पत्नीचा प्रियकर अंकित वडेला आणि त्याचा मित्र चेतन बाबरीया याने प्रितीला जाळ्यात ओढल्याचा आरोप केला आहे.

आईला व्हाट्सअॅपवर पाठवली क्लिप

त्याने आत्महत्या करत असल्याची ही क्लिपही आपल्या आईला पाठवली. त्यानंतर मोबाईल रेकाॅर्डिंग सुरु ठेवून गळफास घेतला. पोलिसांनी याप्रकरणी अंकित आणि त्याचा मित्र चेतन याला अटक केली आहे. तसेच याप्रकरणी तपास सुरु केला आहे. प्रितीला देखील कडक शिक्षा व्हावी ही मागणी मयूरच्या कुटुंबियांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत