मंगळवार, 7 डिसेंबर 2021

Follow Us

Follow Us

पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक शरीरसंबंध

रायगड माझा वृत्त | मुंबई 

Image result for rape crime

विवाह संकेतस्थळावरून दोघांचा विवाह झाला. विवाहाच्या काही दिवसांनंतरच पतीच्या अनैतिक संबंधांबाबत पत्नीला समजले. दोघांमध्येही खटके उडायला  सुरुवात झाली आणि अशातच पतीने पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक संभोग केल्याचा प्रकार गोरेगावमध्ये उघडकीस आला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरे पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोरेगाव पूर्वेकडील परिसरात तक्रारदार ३४ वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. २०१३ मध्ये तिची विवाह संकेतस्थळावरून अखिलेश्वर झा सोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाह केला. लग्नात वडिलांनी तिला ५ लाख १३ हजार रुपयांचे दागिने दिले. अखिलेश्वरने ते स्वत:कडे ठेवले. लग्नाच्या काही दिवसांतच अखिलेश्वरचे अन्य एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे नेहाला समजले. त्याने नेहाचे दागिनेही त्या महिलेला दिल्याने दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. नेहाने शारीरिक संबंध तोडले. याच रागात त्याने लॅपटॉपवर अश्लील व्हिडीओ दाखवून नेहासोबत अनैसर्गिक संभोग करण्यास सुरुवात केली. पतीच्या विकृतीला कंटाळून नेहाने २२ जून रोजी आरे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत