पत्नी, प्रेयसीला दौऱ्यावर नेता येणार; BCCI झाली राजी

दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for virat anushka

बीसीसीआयने क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे कर्णधार विराट कोहलीला दिलासा मिळाला असून येत्या काळात अनुष्कालाही त्याला विदेश दौऱ्यांवर नेता येणार आहे.

विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर पत्नी अनुष्का शर्मालासोबत घेऊन गेला होता. तेव्हा पत्नीला किंवा प्रेयसीला विदेश दौऱ्यांवर सोबत घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. यामुळे विराटवर भरपूर टीका करण्यात आली होती. त्यामुळे पत्नी किंवा प्रेयसीलाही सोबत घेऊन जाण्यास परवानगी असावी अशी मागणी विराटने बीसीसीआयकडे केली होती. यावर विचार करून बीसीसीआयने परवानगी दिली असली तरी एक अट घातली आहे. विदेश दौऱ्याचे पहिले १० दिवस पत्नीला किंवा प्रेयसीला सोबत नेता येणार नाही. त्यानंतर ती क्रिकेटपटूसोबत जॉइन होऊ शकते.

काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने अॅशेस कपसाठी खेळाडूंना पत्नी-प्रेयसीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. तेव्हा या नीतीचा ऑस्ट्रेलियाला फायदाही झाला होता. आता येत्या विदेश दौऱ्यात भारताला या नीतीचा काही फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत