पत्‍नी आणि मुलीची गळा दाबून हत्‍या, नंतर स्‍वत: घेतला गळफास; सोलापूरमध्‍ये धक्‍कादायक घटना

सोलापूर :रायगड माझा

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात युवकाने आपल्या पत्नीसह मुलीची गळा दाबून हत्या केली व नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सतीश बंदीछोडे असे पतीचे नाव असून पत्नी अंदवा (२५) आणि वेदिका (३) अशी हत्या झालेल्या पत्‍नी व चिमुरडीचे नाव आहे.

सतीश हा नोकरीनिमित्‍त पुण्‍यात राहत होता. काल रात्री तो पुण्याहून आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी शेतात गेला. त्यानंतर त्याने तिथेच पत्नी आणि मुलीचा गळा दाबून खून केला आणि स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घरघुती वादातून ही हत्या झाल्याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे. अक्कलकोट पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत