पनवेलमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

पनवेल : साहिल रेळेकर 

शिवसेनेचे युवानेते  आणि युवासेना अध्यक्ष  आदित्य ठाकरे यांनी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पनवेल जवळील कोण येथे एक हजार वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण केले. पर्यावरणाचे संवर्धन हि प्रत्येकाची जबाबदारी  आहे. यावेळी  झाडे  लावण्याबरोबर झाडे जागविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर,  शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख  संजय मोरे, बबन पाटील, शिरीष घरत,पनवेल तालुका संपर्क प्रमुख  रामदास पाटील, परेश पाटील, संतोष ठाकूर,  कल्पना पाटील युवासेनेचे रायगड जिल्हा अधिकारी मयूर जोशी, अवचित  राऊत आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत