पनवेल मध्ये तांदळाचा काळाबाजार उघड ।पोलिसांची धडक कारवाई 

शासकीय रेशन तांदुळाचा ११० टन साठा जप्त.

पनवेल शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

नवी मुंबई :अमोल कांबळे

कोरोना साथीचा विषाणू आजार कोविड – १९ व लॉकडाऊन दरम्यान रेशन दुकानदारांच्या बाहेर रेशनचे तांदूळ घेण्यासाठी नागरिकांनी भल्यामोठ्या रांगा लावल्या. याकाळात रेशन दुकानदारांनी देखील जनतेला लुटल्याचे अनेकदा दिसून आले. मात्र खुलेआम काळाबाजार होत असल्याचा प्रकार नुकताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी उघडकीस आणला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे गावातील पलक रेशन गोडावून येथे शासनाने कोविड – १९ या साथीच्या आजारामध्ये गोरगरिबांना पुरविण्यात येणारे रेशन धान्य गरजू पर्यंत पोहचविण्याचे कामी वितरित करण्यासाठी दिलेल्या रेशन मालाचा अवैधरित्या साठा करून काळ्याबाजाराने विक्री केली जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे येथील पलक रेशन गोडावून येथे जाऊन दोन पंचासमक्ष छापा टाकला व याठिकाणी शासनाने कोविड – १९ या साथीच्या आजारामध्ये गोरगरिबांना पुरविण्यात येणारे रेशन धान्य गरजू पर्यंत पोहचविण्याचे कामी वितरित करण्यासाठी दिलेल्या रेशन मालाचा बार्शी जि. सोलापूर येथून चार कंटेनरमधून अवैध वाहतुकीद्वारे जमा करून त्यामध्ये भेसळ करून मालाची विक्री करणाऱ्या गोडाऊनवर धाड मारली.

याकारवाईत ३३,०८,००० रुपये किमतीचा रेशनिंग तांदुळाच्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या एकूण २२२० गोण्या त्यामध्ये ASIAN RICE लोगो असलेल्या व 1) FOOD CORPORTION OF INDIA 2) GOVERNMENT OF PUNJAB 3) GOVERNMENT OF HARYANA असे नाव असलेल्या गोण्या व दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे हस्तगत करण्यात आले असून भीमाशंकर रंगनाथ खाडे, इकबाल काझी, लक्ष्मण चंद्र पटेल या आरोपीना अटक करण्यात आले असून यापैकी भीमाशंकर रंगनाथ खाडे यांच्यावर भोईवाडा पोलीस ठाणे मुंबई येथे गु.रजि. १०/२००१ भा.द.वि. कलम ४२०, ५०६, ५०० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने, पोहवा नितीन वाघमारे, पंकज पवार, पोना गणेश चौधरी तसेच महसूल विभागातील मंडळ अधिकारी श्री संतोष पाटील व पुरवठा लेखा अव्वल कारकून अर्चना घरत, तलाठी पळस्पे तेजराव तवर यांनी केली असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पनवेल व सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत करीत आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत