पनवेल महानगरपालिकेचा २०१८-१९ चा सुधारित व २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प सादर.

पनवेल : रायगड माझा वृत्त 

पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त गणेश देशमुख यांनी स्थायी समिती सभेसमोर सादर केला. या २०१९-२०च्या मूळ अर्थसंकल्पात सुरवातीच्या शिलकेसह रुपये १०३५.९५ कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून रुपये १०३५.०२ कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये जो काही खर्च आहे तो रिअलिस्टिक इन्कम वर आधारित असल्याने फुगीर काहीच नसून याचबरोबर खर्चाची बाजू सांभाळताना पालिकेकडून विकासकामे अधिक प्रमाणात करण्यात आली आहेत असे वक्तव्य आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट्स, ड्रेनेज लाईन्स,सार्वजनिक शौचालये अशा भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत तसेच शहरी भागातील सर्व तलावांचे सुशोभीकरण, १३ स्वछतागृहे,महापालिका ईमारत व परिसर नूतनीकरण/सुशोभीकरण, महापौर व आयुक्त निवासाची बांधणी, शववाहिनी सेवा, पाणी पुरवठा वितरण प्रणाली असा एकूण २५ टक्के स्वहिस्सा व उर्वरित शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पातुन पनवेलच्या नागरिकांना दर्जात्मक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्याद्वारे शहराच्या नावलौकीकात लक्षणीय भर पडेल असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत