पनवेल येथील उपविभागीय अधिकाऱ्यास 1 वर्षाची शिक्षा

ठाणे : रायगड माझा वृत्त

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभाग,पनवेल येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद भैसे यांना ठाणे विशेषन्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

One year punishment for the sub-divisional officer of Panvel | पनवेल येथील उपविभागीय अधिकाऱ्यास 1 वर्षाची शिक्षा 

 त्यांना 1 सप्टेंबर २००९ रोजी नळ पाणी पुरवठा योजनेच्या वाढीव निधिच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी 40 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी नवीमुंबई येथील वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्या विरुद्ध ठाणे विशेष न्यायालयात दोषारोपत्र दाखल केल्यानंतर सुनावणीअंती सबळ पुराव्यानिशी आरोप सिध्द झाल्यावर न्यायालयाने शिक्षा दिली आहे. दोन कलमान्वेय प्रत्येकी एक वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा आणि प्रत्येकी 1 हजार रुपये दंड सुनावला आहे. सरकारी वकील म्हणून मोहोलकर यांनी काम पाहिले. तत्कालीन पोलीस अधिकारी सूर्यकांत कराले होते.

खाजगी व्यक्तील 6 महिन्यांची शिक्षा 

ठाण्यात प्रॉपर्टी टॅक्स नावावर करुन देण्यासाठी 6 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे विशेष न्यायलयाने शेखर बाळू जगताप नामक खाजगी व्यक्तीला 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हा प्रकार 4 डिसेंबर 2013 रोजीचा आहे. 29 ऑगस्ट रोजी न्यायलयाने ही शिक्षा सुनावली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत